जलद कथा स्पर्धेसाठी रचना.
विषय : मांतरलेली रात्र.
विषय : मांतरलेली रात्र.
भुतबंगल्याचा कहर | भयकथा | भाग १
"अनी..... धावू नकोस पडशील."
नवीन घराचा दरवाजा उघडल्यावर धावत आत जाणाऱ्या अनिकेतला त्याची आई सुगंधा ओरडून बोलू लागली.
नवीन घराचा दरवाजा उघडल्यावर धावत आत जाणाऱ्या अनिकेतला त्याची आई सुगंधा ओरडून बोलू लागली.
"जाऊदे ग, मोठा झालाय तो आता."
विशाल मागून हातात सामानाची बॅग घेऊन येत असता हसतच तिला म्हणाला.
विशाल मागून हातात सामानाची बॅग घेऊन येत असता हसतच तिला म्हणाला.
दोघांनी आपल्या नवीन घरात जोड्याने पाऊल ठेवले.
त्यांचं नवीन घर अगदी प्रशस्थ होत. विशालला खरं तर ते घर बँके कडून कमी किमती मध्ये मिळालं होतं.
त्यांचं नवीन घर अगदी प्रशस्थ होत. विशालला खरं तर ते घर बँके कडून कमी किमती मध्ये मिळालं होतं.
ते ३ खोल्यांचं अगदी प्रशस्त घर होत वर एक छान छोट टेरेस देखील होतं. ते घर त्यांनी वडिलांचं जुनं घर विकून दोघा भावांमध्ये ते घर विकत घेतलं होत.
विशालचा लहान भाऊ साहिल उच्च शिक्षण घेण्यासाठी दुसऱ्या शहरात राहत होता. विशाल ने त्याच्या परवानगी ने नवीन घराची पूजा गृहप्रवेश सगळ आटपून आज तो त्याची बायको सुगंधा आणि मुलगा अनिकेत सोबत सामान घेवून तिथे राहायला आले.
"बाबा चाचू कधी येणार आहे ह्या नवीन घरात?"
अनिकेत विशालला विचारू लागला.
अनिकेत विशालला विचारू लागला.
"येईलच तो उद्या परवा आता त्याच शिक्षण पूर्ण झालंय तो आता कायमचा आपल्या सोबतच राहणार."
विशाल साहिल बद्दल दोघांना आनंदाने सांगू लागला.
विशाल साहिल बद्दल दोघांना आनंदाने सांगू लागला.
"ये..... चाचू आता आपल्या सोबतच असणार आम्ही खूप फिरणार खेळणार धमाल करणार."
अनिकेत च बोलणं पूर्ण होताच सुगंधा सामान आवरत त्याला बोलू लागली,"हा....माहित आहे, मोठा चाचू चा लाडका चाचू काही इथे तुझ्या सोबत खेळायला नाही येणार ते कामाला जाणार तू असाच राहणार एकटा."
तिचं बोलणं ऐकून अनिकेत गाल फुगवून तिच्या कडे बघू लागला. त्याला तसा बघून ते दोघे ही त्याच्यावर हसू लागले.
त्या पूर्ण दिवसात त्या दोघांनी आणलेलं सगळं सामान अडगवून घेतलं. अनिकेतचे चिमुकले हात त्यांना मदत करू लागले. दिवसा अखेरीस ते तिघे ही काम करून थकून गेले.
सुगंधाने जेवण बनवायला कंटाळा आल्याचं विशाल समोर जाहीर करून टाकलं. तो उठून त्यांच्या साठी बाहेरून जेवण घेऊन आला. तिघे ही त्याने आणलेले जेवण जेऊन शांत झोपी गेले. थकव्यामुळे त्यांना कधी झोप लागली त्यांचं त्यांनाच कळलं नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून विशाल नोकरीची तयारी करू लागला. त्याने त्याच्या ऑफिस मधून ह्या शहरात बदली मागून घेतली होती आणि नशिबाने त्याला ती मिळाली देखील.
त्याला आज ऑफिसला जाऊन कागदपत्रे सादर करायची होती. त्याची सुट्टी अजून काही दिवस बाकीच होती. त्याला अनिकेतच शाळेत एडमिशन देखील घ्यायचं होत. त्यासाठी तो आणि सुगंधा दुसऱ्या दिवशी पासून प्रयत्न करणार होते.
सकाळच नाष्टा करून विशाल ऑफिससाठी निघून गेला. सुगंधा तिच्या घरातल्या कामांमध्ये व्यस्थ झाली. पण अनिकेतला खेळायला कोणी मित्र नसल्यामुळे तो एकटाच घराच्या आवारात खेळू लागला.
तोच त्याला जाणवलं की त्याच्यावर कोणी तरी नजर ठेवून आहे. त्यांच्या घराच्या बाजूला असलेल्या घरातून त्याला कोणी तरी पाहत होत. ते कोण असल्याचं बघण्यासाठी तो हळू हळू पाऊल टाकत पुढे जाऊ लागला.
तिथे पोहोचताच त्याला घाबरवण्यासाठी अचानक त्याच्या समोर कोणी तरी आलं आणि तो जोरात किंचाळला.
त्याच ओरडणं ऐकुन सुगंधा धावतच त्याच्या जवळ आली आणि त्यांच्या शेजारची निता देखील बाहेर आली.
त्याला घाबरवणारी दुसर कोणी नसून त्यांच्या शेजारीच राहणारी त्याच्या इतकीच लहान मुलगी अबोली होती.
तिची आई निता बाहेर आल्यावर काय झाल्याचे विचारले तेव्हा अनिकेत सगळ्यांना तिने त्याला घाबरवल्याबद्दल सांगितलं. तेव्हा तिच्या आईच्या डोक्यात सगळा प्रकार आला आणि तिने तिला एक जोराचा धपटा चडवला ज्याने ती कळवळून रडू लागली.
ते बघताच सुगंधा पुढे होऊन त्या मुलीला कुशीत घेऊन बोलू लागली,"जाऊद्या ओ लहान आहे, कशाला मारता मुलं म्हंटल्यावर असं होणारच."
सुगंधाच बोलणं ऐकून निता देखील शांत होऊन तिची विचारपूस करू लागली,"तुम्ही नवीनच आलात का इथे राहायला? आम्हाला ठावूकच नाही. पोरीला सुट्टी होती म्हणून गावी गेलो होतो ते आज सकाळीच आलो." अश्या त्यांच्या गप्पा सुरू झाल्या.
अबोली ने अनिकेत ची माफी मागितली ते दोघे बाजूला जाऊन खेळू लागले. त्या दोघींच्या गप्पा चालू असतानाच शेजारच्या नीताच्या घरून एक तरुण मुलगी बाहेर आली सडपातळ शरीर गोरा रंग लांब केस असणारी दीपा.
ती अबोलीचा आवाज ऐकुन बाहेर आली,"काय ग वहिनी काय झालं? कशाला रडते अबोली?" तिचं बोलणं ऐकताच अबोली धावतच तिच्या कडे गेली आणि आईने तिला मारल्याच सांगितलं. ती तिची लाडकी होती.
दीपा काही बोलण्याआधीच निताने त्यांच्या नवीन शेजाऱ्यांची ओळख करून दिली. दीपाने हसतच सुगंधाची भेट घेतली. गप्पा आवरून त्या तिघीही घरात निघून गेल्या.
अनिकेत आणि अबोली घराच्या बाहेर खेळू लागले. अबोलीने कॉलनी मधील बाकी मुलांसोबत देखील त्याची ओळख केली. आता अनिकेतला अजिबात एकट वाटत नव्हत. एकाच दिवसात अबोलीमुळे त्याला बरेच मित्र मैत्रिणी मिळाले. दुपारच्या जेवणासाठी सुगंधाला त्याला बोलवून घेऊन यावं लागलं. तो नवीन मित्रांमध्ये इतका रमून गेला.
ऑफिसचा पहिला दिवस असल्यामुळे विशाल आज लवकर घरी आला. घरी येऊन फ्रेश होऊन जेवायच्या आधी तो अनिकेतला मांडीवर घेऊन त्याच्या दिवस भराच्या गप्पा ऐकू लागला. मग तिघांनी जेवण करून घेतले आणि अनिकेत खेळून थकल्यामुळे दोघांच्या आधीच झोपायला गेला.
सुगंधा काम आटपून विशाल सोबत हॉल मध्ये बोलत बसली,"मग आजचा पहिला दिवस कसा होता साहेबांचा?"
त्यावर तो बोलू लागला,"खूप छान सगळ्यांशी ओळख करून घेतली मला वेगळी कॅबिन दिली. मोठी पोस्ट तर मोठी जबाबदारी बघुया कसं जमतंय आता. तसा स्टाफ छान आहे आजचा पहिलाच दिवस होता कळेल हळू हळू. ते जाऊदे तू सांग तुझा आजचा दिवस कसा होता काय केलस दिवस भर?"
त्यावर ती बोलू लागली,"होईल रे सगळ ठीक तू करशील हँडेल नीट. आणि माझं काय नवीन घर कामच आणि हो आपले शेजारी आहेत बर का. मला भेटले आज छान फॅमिली आहे इतके दिवस ते गावी होते म्हणून आपल्याला भेटले नाही आज सकाळीच आलेत ते परत."
तिच्या बोलण्यावर तो पुढे बोलू लागला,"वाह... छानच आहे की तुला आता कंटाळा नाही वाटणार आणि अनिकेत ची मैत्रीण अबोली तिचं शेजारी वाटत?" त्या वर तिने होकारार्थी मान हलवली आणि दोघे ही हसू लागले.
इतक्यात विशाल ने घड्याळात पाहिले बराच उशीर झाला होता ते गप्पा संपवून त्यांच्या रूम मध्ये जाऊन शांत झोपी गेले.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा